दापोली : तालुक्यातील दाभोळ बंदरात मासळी लिलावात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन एकीकडे शर्थीचे प्रयत्न करत असून दुसरीकडे मात्र दाभोळ बंदरात कोरोनाचे सर्व नियम बाजूला ठेवून मासळी लिलाव केला जात आहे. याकडे येथील स्थानिक व्यवस्था यांनीदेखील दुर्लक्ष केले असून, या ठिकाणी कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 03-Dec-20