मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा बससेवा सुरू

0

मंडणगड : तिडे गृप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड तिडे ठाणे नालासोपारा अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. हि बससेवा मंडणगड येथून सं 04:15 वा सुटून केळवत, कुंबळे, तिडे, तळेघर, सडे, आतखोल, शेनाळे, महाप्रळ, चिंबाव, तुडील, महाड, माणगांव, कोलाड, नागोठणे, वडखल, रामवाडी, पनवेल, कोकणभवन, नेरूळ, कळवा, ठाणे, घोडबंदर, वसई फाटा, नालासोपारा येथे 12 वा पोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरीता नालासोपारा येथुन स.05:15 वा सुटणार आहे. या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या प्रसंगी विभाग नियंत्रक श्री सुनिल भोगरे, विभागीय वाहतुकचे श्री सचिन सुर्वे, अनंत जाधव मंडणगड आगारव्यवस्थापक हनुमंत फडतरे वाहन परीक्षक श्री भिसे, गृप ग्रामपंचायत तिडे तळेघर सरपंच श्री सुरेश बैकर,उपसरपंच दादा पांढरे,मोहला अध्यक्ष बासीर खलफे,तंटामुकत अध्यक्ष दिलावर वलेले, शौकत तांबे, मकबुल तांबे, फुरकान वेलेले, बासीर खलफे, दत्ताराम महाप्रळकर, दया मामा, मुकतार धनसे, सादिक वेलेले, रूपेश महाप्रळकर,संतोष खैरे,शांताराम निमदे,लियाकत चिकलकर,रियाझ जोगिलकर,सिराज जोगिलकर,अयुब जोगिलकर,अब्दुला खलफे,अब्दुल कादिर खलफे,हसन फ खलफे,अजिझ जोगिलकर,बासिद,ईकमान चिकलकर, दत्ता मुरुडकर,बबन देवघरकर,संदेश करावडे,जफार वेलेले,सचिन महाप्रळकर,सागर तांबुटकर,बादशाह चिकलकर ,महोमद मांडलेकर,सोहेब खलफे,कोकण एसटी प्रेमी गृपचे अध्यक्ष अपेक्षित कुळये,उपाध्यक्ष श्री विकास गुरव,संवाद कार्यकारिणी संघ पुणे व पुणे कल्याण मार्गे सावंत वाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती कल्याणचे संपर्क प्रमुख श्री वैभव बहुतुले मंडणगड आगाराचे चालक श्री शिरसाट वाहक श्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:26 PM 03-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here