लांजा शहरातील ‘ते’ 50 वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड तोडल्याने नागरिकांतून समाधान

0

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती मधुराम मिलिंद लांजेकर यांच्या विशेष प्रयत्नातून अखेर 50 वर्षांपूर्वीचा तो जुनाट वृक्ष तोडण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. लांजा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये श्री. चव्हाटा मंदिराशेजारी असणारे चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीचे जुनाट आंब्याचे झाड हे अतिशय धोकादायक बनले होते. याठिकाणी मंदिर आणि मस्जिद असल्याने या ठिकाणी नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच या ठिकाणच्या रस्त्यावरूनही वाहनांची वर्दळ सुरू असते. अशा परिस्थितीत हे जुनाट आंब्याचे झाड केव्हाही मोडून पडेल अशा स्थितीत उभे होते त्यामुळे हे झाड तोडण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांतून केली जात होती. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन लांजा नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती मधुरा मिलिंद लांजेकर यांनी या हे झाड तोडण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी त्यांना नगरसेवक गुल्या नेवरेकर, नगरसेवक राजेश हळदणकर यांचे विशेष सहकार्य लाभले
 
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:09 PM 03-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here