देवरूख : शहराची ग्रामदेवता सोळजाई मातेचा देवदिवाळी यात्रोत्सव यावर्षी रद्द होणार आहे. कोरोनामुळे शासनाने यात्रांना बंदी केली आहे.यामुळे देवदिवाळी यात्रेला १५३ वर्षांनी खंड पडणार आहे. प्रतिवर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहाने भरते. सोळजाई देवी ही ४४ खेड्यांची मालकीण असल्याने देवीचा यात्रोत्सव भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडतो. यावर्षी केवळ देवीचे दर्शन घेण्याची मुभा आहे. दर्शन देखील सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करून दिले जाणार आहे. दर्शन एका तासाला १०० भक्तांना दिले जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 04-Dec-20