पुणे-नागपूरचे निकाल म्हणजे महाविकास आघाडीच्या कामावर शिक्कामोर्तब : शरद पवार

0

पुणे : धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण तेथील उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांत केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. पण बाकीच्या ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची पावती आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ 5 दशकं भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलं नव्हतं. पण यंदा पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. या बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असंच या निकालातून पाहायला मिळत आहे, असं शरद पवार म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:46 AM 04-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here