आशा गटप्रवर्तकांनी सिंधुदुर्गनगरीत रास्ता रोको आंदोलन

0

ओरोस : आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात तिप्पट वाढ व्हावी, गटप्रवर्तकांना किमान तीन हजार रु. मानधन वाढ मिळावी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करणार्‍या आशा व गटप्रवर्तकांना सेवेत कायम करावे, आदी मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत  असल्याच्या निषेधार्थ आशा वर्कर्स युनियनच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर सिंधुदुर्गनगरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.या प्रकरणी पोलिसांनी 350 जणांना अटक करून नंतर सोडून दिले  याबाबत माहिती देताना संघटनेच्या अध्यक्षा विजयाराणी पाटील म्हणाल्या,  शासनाने आशा स्वयंसेविकांना मानधन वाढीचा निर्णय घेतला असला तरी त्याचा अद्याप अध्यादेश काढलेला नाही. आता विधानसभा निवडणूक आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे.  त्यामुळे मानधन वाढीचा हा निर्णय तत्काळ लागू करावा, अशी आमची मागणी आहे. गटप्रवर्तकांनाही किमान 3000 मानधन वाढ मिळाली पाहिजे. आमच्या या मागण्या रास्त असून शासन याकडे कानाडोळा करत असल्यारने आम्हाला आमच्या न्यायहक्कांसाठी रोको करावा लागत आहे. आशा गटप्रवर्तकांना  शासकीय सेवेत कायम करीपर्यंत आम्ही आमचा लढा कायम ठेवू, असा इशारा या कर्मचार्‍यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हा आशा वर्कर युनियनच्या नेत्या  विजया राणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली  आशा व गटप्रवर्तकांनी मुंबई-गोवा  महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यावर  रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सुमारे अर्धा तास रास्ता रोको केल्यावर पोलिसांनी संघटनेच्या नेत्या विजया राणी पाटील त्यांच्यासह 350 आशा व गटप्रवर्तकांना ताब्यात घेतले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here