धाड टाकून वरची निवेंडी येथे तीनशे रुपयांचा दारु साठा जप्त

0

रत्नागिरी : तालुक्यातील वरची निवेंडी येथे जयगड पोलिसांनी छापा टाकून गोठ्यात गावठी दारुची विक्री करणार्‍या विरोधात कारवाई केली. या छाप्यात तीनशे रुपयांचा दारु साठा जप्त करण्यात आला. भालचंद्र शांताराम भूते (43, रा.वारपटवाडी निवेंडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जयगड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार,पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी वारपटवाडी येथील भालचंद्र भूतेच्या घरावर छापा टाकला. तेव्हा तो गुरांच्या गोठ्यात गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:24 PM 05-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here