मुंबई : हवामान विभागाने मुंबई आणि रायगडमध्ये आज रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कोकण विभागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत दिली आहे. आज कोकण, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात पावसामुळे राज्यात हाहाकार उडाला होता. आता पाऊस परतीच्या मार्गावर आहे. मात्र सध्या कोकण आणि गोव्यात मान्सून सक्रिय आहे. मुंबई, रायगडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
