मच्छीमारांची विस्कटलेली घडी हळूहळू पूर्वपदावर

0

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यापासून बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम मच्छीमारी व्यवसायावर झालेला होता; मात्र गेल्या आठवड्यात परिस्थिती सुधारु लागली आहे. बहूतांश मच्छीमारांना बांगड्याचा आधार मिळाला आहे. छोट्या मच्छीमारांसह पसर्सिननेटलाही बांगडा मिळत असल्याने विस्कटलेली आर्थिक घडी स्थिरावण्यास मदत होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याबरोबरच वाशी, पेढी, सुरमई हे मासे मिळत आहेत. गेले आठवडा बांगडा चांगल्या प्रकारे मिळत असल्याने हा महिना सुखद जाईल, असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 07-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here