महाराष्ट्र समविचारी मंचचे १४ डिसेंबरला लाक्षणिक उपोषण

0

रत्नागिरी : शासनाने कोरोना महामारीच्या काळात कमी कालावधीसाठी आरोग्य विभागात विविध सवर्गाची पदे भरली आणि गरज संपताच या कर्मचाऱ्यांना कमी केले. राज्यातील आरोग्य विभागात सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत. सगळीकडे कोरोना भीतीचे सावट असताना या कर्मचाऱ्यांनी जीवाचा विचार न करता काम केले असे असूनही त्यांना कमी करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. या विरोधात महाराष्ट्र समविचारी मंचने राज्यभर आंदोलनाची हाक दिली असून त्याची सुरवात येत्या १४ डिसेंबरला एक दिवशीय लाक्षणिक उपोषणाने रत्नागिरी येथून होणार आहे. तरी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामध्ये विविध सवर्गातील ज्या ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीत काम केले अशांनी या उपोषणात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, युवा प्रमुख अँड. निलेश आखाडे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:56 PM 07-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here