बायडन यांचा राष्ट्राध्यक्षपद शपथ सोहळा साधेपणाने होणार ?

0

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, शपथविधी सोहळा साधेपणाने आणि लाखोंची गर्दी टाळण्याच्यादृष्टीने आयोजित करण्यात येणार आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कमी गर्दीत आटोपशीर आणि साधेपणाने शपथ सोहळा असणार आहे.
२० जानेवारीला होणारा अमेरिकेतील अध्यक्षीय पदग्रहण सोहळा भव्यदिव्य पद्धतीचा नसेल, तर तो साधेपणाने आणि जास्तीत जास्त आभासी पद्धतीने आयोजित केला जाईल, असे संकेत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी दिले. ‘अध्यक्षपदाचा शपथविधी आधीच बांधण्यात आलेल्या व्यासपीठावरच २० जानेवारीला होईल. मात्र हा सोहळा व संचलन पाहण्यासाठी नॅशनल मॉल आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू येथे होणारी लाखोंची गर्दी टाळण्याची योजना आहे. शपथविधी सोहळा भव्य नसला, तरी यानिमित्त संपूर्ण देशभर आभासी कार्यक्रम घेतले जातील व यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त संख्येने नागरिक सहभागी होतील. सध्या यावर काम सुरू आहे. त्यामुळे हा सोहळा नेमका कसा असेल, हे आता सांगता येणार नाही,’ असे बायडेन म्हणाले. हा कार्यक्रम साधारण ऑगस्टमध्ये झालेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनासारखा असेल व यात ऑनलाइन कार्यक्रमांची अधिकाधिक रेलचेल असेल, असेही त्यांनी नमूद केले. ‘अध्यक्षपदाचा शपथविधी सोहळा व प्रामुख्याने दोन लाख नागरिकांची गर्दी कशाप्रकारे नियंत्रित करता येईल, याबाबत आम्ही प्रतिनिधी आणि सिनेट नेतृत्वाशी चर्चा करत आहोत. परंतु यावेळचा सोहळा जास्तीत जास्त प्रकारे आभासी पद्धतीचा असेल. नागरिकांची सुरक्षितता हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु त्यांना जल्लोषाद्वारे आनंद साजरा करण्याची परवानगी देणे, एकमेकांना आनंद साजरा करताना पाहणे यावरही विचार सुरू आहे,’असे बायडेन यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:21 PM 07-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here