खड्यांची प्राधिकरणाने घेतली तातडीने दाखल

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील खड्याप्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची विनंती रत्नागिरीतील जनजागृती संघाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केली. याची प्राधिकरणाने दखल घेत रत्नागिरी नगर परिषदेकडे संपूर्ण माहिती मागविली आहे. ही माहिती जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडून राज्य प्राधिकरणाकडे पाठवली जाणार आहे. रत्नागिरी शहरात २५ मे ते १५ जून २०१९ पर्यंत रस्त्यांच्या कामावर मोठा खर्च झाला आहे. त्यात आता खड्डे भरण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु खड़े मुरुमाने भरले जात आहेत. त्यावर सपाटीकरणासाठी रोलरचा वापर केला जात नसल्याने खड्डे ओबडधोबड़ झाले आहेत. याची तपासणी करून दोषींवर कारवाई केली जावी. त्याचबरोबर नाहक खर्च झालेली रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केली जावी, अशा आशयाची विनंती जनजागृती संघाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केली आहे. जिल्हाविधीसेवाप्राधिकरणाकडे केलेली ही विनंती जनतेच्या वतीने केली असल्याने प्राधिकरणाने विनंती अर्ज दाखल झाल्यानंतर तातडीने दखल घेत कार्यवाही सुरू केली. त्यानुसार रनपला या खड्ड्यांसंदर्भात सर्व माहिती देण्यासाठी पत्र दिले आहे. दरम्यान या संदर्भात होणाऱ्या तपासणीवेळी आमचे पदाधिकारी उपस्थित राहू शकतील, असेही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला जनजागृती संघाने कळवले आहे.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here