आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत धावपळ सुरू

0

रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या आठवड्यात कोणत्याही दिवशी लागू होईल. त्या आधी जिल्ह्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी, निविदा देण्यासाठी सगळ्यांचीच धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात सध्या शाळा, अंगणवाडी दुरुस्ती आणि नवीन बांधणे, स्मशानभूमी, सीमाभिंत, रस्ते आदी विकासकामे मंजूर करून त्याची निविदा काढून घेण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. त्यासाठी नऊ तालुक्यांतील पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह कार्यकर्ते मागील ८ दिवसांपासून जिल्हा परिषदेत येत आहेत. विशेषतः बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग, पंचायत, महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागात अधिक वर्दळ आहे. जोपर्यंत आचारसंहिता जाहीर होत नाही, तोपर्यंत जिल्हा परिषद गर्दीने भरलेली असेल. ज्या दिवशी आचारसंहिता जाहीर होईल, त्यादिवशीपासून जिल्हा परिषदेत पुढील दीड महिना शुकशुकाट असणार आहे. ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे तब्बल २५ दिवस जिल्ह्यातील गावाचा कारभार ठप्प होता. चार दिवसांपूर्वी आंदोलन संपले आणि सोमवारपासून गावाचा कारभार सुरू झाला. मात्र, आता या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे २५ दिवसांचा ‘बँक लॉग’ कसा भरू काढणार. या दिवसांमध्ये अनेक कामे मार्गी लागली असती. योजनांचा नागरिकांना लाभ मिळाला असता. मात्र, आता ‘फास्ट ट्रॅक’वर ग्रामसेवकांनी विकासकामे आणि योजना मार्गी लावाव्या लागणार असल्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here