खेड : खेड तालुक्यातील लोटे येथील तन्वी भूषण रेडीज हिने दक्षिण कोरियामध्ये योगासन स्पर्धेत भारत देशाकडून खेळताना तीन सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन महाजनादेश यात्रेनिमित्त रत्नागिरी येथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी खेड भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील लोटे येथील योगकन्या तन्वी भूषण रेडीज हिने दक्षिण कोरियात झालेल्या आंततराष्ट्रीय योगासन स्पर्धेत केलेले योगासन प्रात्यक्षिक लक्षवेधी ठरले. तिला योगासन (वैयक्तिक), रिदमिक योगा (जोडी), फ्री फ्लो योगासनामध्ये (ग्रुप) या गटामध्ये सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमंगळवारीमहाजनादेश यात्रेदरम्यान तिच्या कामगिरीचा गौरव केला.
