शरद पवार उद्या दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक घेणार

0

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (९ डिसेंबर) सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. यात भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. शरद पवार उद्या अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:37 PM 08-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here