रायगड येथील जेट्टी दुरूस्ती व रूंदीकरणासंदर्भात कार्यवाहीस गती द्यावी : दत्तात्रय भरणे

0

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत रायगड येथील जेट्टीची दुरूस्ती आणि रूंदीकरणासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. वीज, सॅटेलाईट, स्वच्छता गृहे, रस्ता दुरूस्ती करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. जेट्टी परिसरात उपलब्ध जागेची तपासणी करून डिझेल पंप आणि शितपेटी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. मंत्रालयात अलिबाग येथील जेट्टीची दुरूस्ती व रूंदीकरण तसेच अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:18 PM 08-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here