रत्नागिरी : ग्रामसेवकांच्या संपामुळे आधीच ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. अशातच विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना पंचायत समितीने ठेवलेल्या प्रशिक्षण शिबीरावर सरपंचांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. प्रशिक्षण कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणीही सरपंचांनी केली परंतु, गटविकास अधिकाऱ्यांनी ही मागणी धुडकावल्याने नाराज झालेल्या सरपंचांनी प्रशिक्षण कामकाजावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ ग्रामसेवकांचेच प्रशिक्षण घेण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणार आहे. 4 आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रमसेवकघटनेने बेमुदत आंदोलन पुकारले होते. तब्बल २२ दिवस आंदोलन सुरू राहिल्याने ग्रमपंचायतीचे कामकाज पर्णतः ठप्प झाले होते. विकासकामांच्या प्रस्तावासह ग्रमपंचायतीच्या मासिक सभाही झालेल्या नाहीत. याचा परिणाम गावाच्या विकासासावर झाला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताकोणत्याहि क्षणी लागण्याची शक्यता असल्याने त्यापुर्वी विकासकामांना मंजुरी, विकास कामांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी ग्रमसेवक कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. ग्रमपंचायतीचा कारभार ठप्प असताना रत्नागिरी पंचायत समितीने सरपंचांसह ग्रमसेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शामराव पेजे सभागृहात आयोजित केले आहे. प्रशिक्षणासाठी सरपंचांना लेखी पत्र न देता ग्रामसेवकांच्या व्हॉट्सअॅपवर निमंत्रण देवून सरपंचांना बोलविण्याची सूचना ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी केल्यामुळे सरपंच अधिकच संतप्त झाले आहेत. ग्रामसेवकांचे प्रशिक्षण आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर घेण्यात यावे. तोपर्यंत सर्व ग्रमपंचायतींना प्रलंबित कामे करणे शक्य होईल अशी मागणी सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंचांची मागणी धुडकावून लावून बुधवारपासून प्रशिक्षण सुरू केले. गटविकास अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे सरपंच संतप्त झाले असून त्यांनी पशिक्षणावर अघोषित बहिष्कार टाकला. त्यामुळे बुधवारच्या प्रशिक्षण शिबीरात केवळ ग्रामसेवक उपस्थित होते. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार असल्याने त्यानंतर ग्रमपंचायतीच्या मासिक सभा घेऊन उपयोग काय असा प्रश्न सरपंचांनी उपस्थित केला आहे. वस्तुस्थिती लक्षात न घेता गटविकास अधिकाऱ्यांनी ठेवलेले प्रिशक्षण अयोग्य असल्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष विजय चव्हाण, सचिव मिलिंद खानविलकर यांनी सांगितले.
