रत्नागिरी : शासनाच्या हरित महाराष्ट्र संकल्पनेत सहभागी होताना स्वयं सहाय्यता समुहातील महिलांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक नितीन माने यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात 15 जुलै या एकाच दिवशी 1 लाख 39 हजार 301 ‘उमेदवृक्षां’ची लागवड करण्यात आली. हरित महाराष्ट्र संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी लोकचळवळ उभारावे, असे शासनाचे धोरण आहे. त्यातून दुष्काळ, पाणीटंचाई, जागतिक तापमानवाढ, निसर्गाचा समतोल, भूजलपातळी आणि इतर नैसर्गिक आपत्यांवर मात करण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र 20 टक्के वरून 30 टक्के पर्यंत नेण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यात आपलाही सहभाग असावा यासाठी स्वयं सहाय्यता समूह, त्यात सहभागी महिला सदस्या आणि उमेद अभियानातील कार्यरत कर्मचारी यांनी ‘उमेदवृक्ष लागवड मोहीम’ राबवावी, असे आवाहन गोयल यांनी केले होते. या आवाहनला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील 13 हजार 125 समुहातील 1 लाख 39 हजार 198 सदस्य आणि 103 कर्मचार्यांनी मिळून 1 लाख 39 हजार 301 उमेदवृक्ष लावले आहे. यासाठी उमेदचे विक्रम सरगर आणि अर्च विशेष म्हणजे लागवड करण्यात आलेली रोपे ही भविष्यात उत्पन्न देणारी आहेत. (आंबा, काजू, आवळा, जांभूळ, कोकम, नारळ, सुपारी, फणस, साग, बेल, रिठा, हिरडा, चिंच, सोनचाफा, बांबू, सिताफळ, पेरू, शेवगा, बोर, लिंबू, चंदन इ्.) यंदाच्या वर्षी या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता असा उपक्रम दरवर्षी घेण्यात येणार आहे. यातून लाखो झाडे लावण्यात येणार आहेत. यातून मिळणारे उत्पन्न त्या महिलांनाच मिळणार आहे.
