चिदंबरम यांचा तिहार मुक्काम ३ आक्‍टोबरपर्यंत वाढला

0

नवी दिल्‍ली : माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते पी. चिदंबरम यांचा तिहारमधील मुक्काम आणखी १४ दिवसांनी वाढला आहे. गुरुवारी (ता.१९) दिल्‍लीतील रोव्हज अव्हेन्यू न्‍यायालयाने त्‍यांना झटका दिला. न्‍यायालयाने त्‍यांच्‍या १४ दिवसांनी न्‍यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यांना ३ आक्‍टोबरपर्यंत तिहारच्‍या न्‍यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयकडून चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्‍यासमोर चिदंबरम यांची न्‍यायालयीन कोठडीक वाढ करण्‍याची मागणी केली. चिंदबरम यांची बाजू मांडत असलेल्या कपिल सिब्‍बल यांनी न्‍यायालयीन कोठडी वाढविण्‍याच्‍या निर्णयाचा विरोध केला. कपिल सिब्‍बल यांनी चिदंबरम तिहारमध्‍ये न्‍यायालयीन कोठडी असताना त्‍यांच्‍या दैनंदिन वैद्यकीय तपासणी आणि आहारासाठी अर्ज दाखल केला. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटले आहे की, ७३ वर्षीय चिदंबरम ५ स्‍पटेंबरपासून तिहारच्‍या तुरुंगात आहेत. ते विविध आजारांचा सामना करत आहेत. तसेच तिहारमध्ये आल्यापासून यांच्‍या वजनात देखील घट झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here