दिल्‍ली: ऑड- इव्हन नियमांचे उल्‍लघन करणार्‍यांवर होणार जबरा दंड

0

नवी दिल्‍ली : दिल्‍लीच्या हवा प्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा ४ ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऑड-इव्हन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ नोव्हेंबरला २,४,६ आणि ८ नंबरच्या गाड्या रस्त्‍यावर चालणार. तसेच ५ नोव्हेंबरला १,३,५,७ आणि ९ क्रमांकाच्या गाड्या चालतील. ऑड – इव्हनचे नियम हे ऑटो आणि टॅक्‍सी या दोन्हीसाठी लागू असणार आहेत. ऑड- इव्हन नियमांचे उल्‍लघन करणार्‍यांवर यावेळी २०,००० रूपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. या आधी नियमांचे उल्‍लंघन केल्‍यावर २००० रूपयां पर्यंतचा दंड वसूल केला जात होता. या आधी २०१६ मध्ये १ ते १६ जानेवारी दरम्‍यान ऑड-ईवनची पहिल्या आवृत्तीमध्ये 10,021 मोटर चालकांकडून तब्‍बल २ कोटींपर्यंत दंड वसूल करण्यात आला होता. दरम्‍यान २०१६ पासून पुन्हा या योजना लागू करण्यात आली. यावेळी ७,३०० मोटर चालकांना दंड करण्यात आला आणि त्‍यांच्याकडून १.५ कोटी रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here