मराठा आरक्षण : स्थगिती उठवली न जाणं ही सरकारची एक प्रकारे नाचक्की : चंद्रकांत पाटील

0

मुंबई : मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिलाय. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारची पूर्वतयारी नसल्याने मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहिली, ही सरकारची नाचक्कीच आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

न्यालयापुढे आज मुकुल रोहतगी यांनी कोणतेही नवीन मुद्दे न मांडता पुन्हा-पुन्हा तेच तेच मुद्दे मांडले आहेत. जेव्हा पुनर्विचार याचिका दाखल केली जाते तेव्हा नवे मुद्दे मांडायचे असतात. मागील वेळी जे मुद्दे मांडले तेच आज मांडले गेले त्यामुळेच यावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नाकर दिलाय. आता जानेवारीमध्ये सुनावणी होणार असल्याने मराठा समाजापुढे मोठा अंधार निर्माण झालाय, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:01 PM 09-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here