सह्याद्रि एमबीए सावर्डेमध्ये एमबीए अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ करिता ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी केंद्राचे उद्घाटन

0

सावर्डे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत होणारी सन २०२०-२१ करिता एम.बी.ए./एम.एम.एस. अध्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यावर्षी उद्भवलेल्या कोविड -१९ च्या परिस्थितीमुळे सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी केंद्र म्हणून सह्याद्रि एम.बी.ए. सावर्डे या महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. ०८ डिसेंबर २०२० पासून सुरु होणारी ही प्रक्रिया जवळपास एक महिना चालेल. प्रवेश प्रक्रियेमध्ये कम्प राऊंड मधून अॅडमिशन घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली प्रवेश नोंदणी व कागदपत्रे पडताळणी दि. १३ डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी.
ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी केंद्राचे उदघाटन, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री. महेश महाडिक सर व सह्याद्री पॉलिटेक्नीकचे प्राचार्य श्री. मंगेश भोसले सर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीम. आश्विनी महाडिक, प्राचार्य श्री. एकनाथ गावडे सर, प्राचार्य श्री. टी.वाय.कांबळे सर व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:59 PM 09-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here