आर.के.एस भदौरिया होणार भारतीय हवाई दलाचे प्रमुख

0

नवी दिल्ली : हवाई दलाचे व्हाईस चीफ एअर मार्शल आरकेएस भदौरिया नवीन हवाईदल प्रमुख होणार आहेत. ते एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांची जागा घेतील जे 30 सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘सरकारने एअर व्हाईस चीफ एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांना पुढील हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.’एअर मार्शल भदौरिया यांनी मेमध्ये भारतीय हवाई दलाचे व्हाईस चीफ मार्शल म्हणून पदग्रहण केले होते. भदौरिया एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत आणि 15 जून 1980 मध्ये हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या तुकडीत सहभागी झाले होते. भदौरिया यांनी लवकरच भारताला मिळणार असणारे राफेल विमानही उडवले आहे. भदौरिया यांना आपल्या सेवा काळात परम विशेष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि हवाई दल पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नुकतेच हवाईदल प्रमुख धनोआ हे पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबरोबर मिग 21 उडवताना दिसले होते. तेव्हाच त्यांनी आपल्या कारकिर्दीतील मिग 21 चे हे शेवटचे उड्डाण असणार असल्याचे म्हटले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here