नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

0

लंडन – पंजाब नॅशनल बँकेत कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडनच्या कोर्टाने दणका दिला आहे. कोर्टाने नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. सध्या नीरव मोदी ब्रिटनच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आज वेस्टमिन्स्टरच्या कोर्टात नीरवच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि परदेशात फरार असलेला नीरव मोदी याच्याभोवती भारतीय तपास यंत्रणांनी फास आवळला आहे. स्वित्झर्लंड येथे नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदीशी संबंधित चार बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये 283.16 कोटी रुपये जमा होते. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here