चिपळूणच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी : ना. एकनाथ शिंदे

0

चिपळूण : चिपळूण शहर विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्याची व्यवस्था करीन. तसेच भविष्यातील विकासकामांसाठीचा दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिली. चिपळूण न.प. महाविकास आघाडीतील नगरसेवकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.९) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहरातील विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाप्रमुख कदम यांनी शहर विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्याकरिता विशेष निधीची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार प्राथमिक स्तरावर पाच कोटींचा निधी देत असल्याचे तसेच विशेष कामांना खास बाब म्हणून दहा कोटींचा निधी देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ असेही ना. शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे, नगरसेविका सफा गोठे, संजीवनी शिगवण, अपक्ष नगरसेवक अविनाश केळसकर, शिवसेनेचे नगरसेवक शशिकांत मोदी, स्वाती दांडेकर, सुषमा कासेकर, अपक्ष नगरसेविका संगिता रानडे, माजी नगरसेवक महंमद फकीर, अक्षय काजारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:51 AM 11-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here