लोक नाणार प्रकल्पाचे स्वागत करत असतील तर शिवसेना आड येणार नाही

0

कोकणातील नाणार हा रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने जोरदार विरोध केला. त्यामुळे तो प्रकल्प रद्द करण्यात आला. मात्र मंगळवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नाणाराबाबत पुनर्विचार करण्याचे सुतोवाच राजापूर येथे केले. त्यामुळे शिवसेनेही मवाळ भूमिका घेतली आहे. लोक नाणार प्रकल्पाचे स्वागत करत असतील तर शिवसेना विकासाच्या आड येणार नाही, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेने विरोध केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होणारा रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेदरम्यान मंगळवारी कोकणातील राजापूर येथे होते.

तेथे त्यांची सभा झाली. त्यावेळी उपस्थितांकडून नाणार प्रकल्पाच्या बाजूने घोषणा देण्यात आल्या. त्याबाबत बोलताना नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत पुनर्विचार करता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने मंगळवारी रात्री ठाण्यात आलेले आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या नाणार प्रकल्पाच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जर लोकांना विकास (नाणार रिफायनरी) हवा असेल तर आम्ही त्याच्या आड येणार नाही. लोकांचा नाणारला विरोध असेल तर शिवसेनेचाही विरोध आहे. मात्र लोक प्रकल्पाचे स्वागत करत असतील तर शिवसेना विकासाच्या आड येणार नाही. शिवसेना कधीही, कुठेही विकासाच्या आड येत नाही. प्रकल्प इतर ठिकाणी येत असेल तरीही आम्ही त्याचे स्वागत करु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here