मुर्शी येथे गोठा जमीनदोस्त; ७ गुरे बालंबाल बचावली

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी मावळत धनगरवाडी येथील सखुबाई गंगू पिंगळे यांच्या मालकीचा गोठा बुधवारी सायंकाळी ७ वा.च्या सुमारास कोसळून जमीनदोस्त झाला. या घटनेत ७ जनावरे बालंबाल बचावली आहेत. गोठ्यात एका बाजूस ७ जनावरे दावणीला बांधण्यात आली होती. त्यांच्यावर छप्पर कोसळले. शेजारी रहाणारे लक्ष्मण पिंगळे, दीपेश पिंगळे, राजाराम पिंगळे, बबन फोंडे यांनी धाव घेत गुरांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेमध्ये जनावरांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. या घटनेमुळे सखुबाई पिंगळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेची खबर माजी सरपंच मंगेश दळवी यांनी तलाठी एस. टी. पवार यांना दिली. घटनास्थळी तलाठी पवार, शिवकुमार दळवी माजी सरपंच मंगेश दळवी यांनी भेट देत पहाणी करून पंचनामा केला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:54 PM 11-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here