देवरुख-मार्लेश्वर रस्त्याची डागडुजी करावी; अन्यथा भाजयुमोचा आंदोलनाचा इशारा

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. या रस्त्याच्यासाठी संगमेश्वर भाजपा कार्यकर्ते आंदोलनासाठी पुढे सरसावले आहेत. संगमेश्वर तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नागिरी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता अशोक भारती आणि शाखा अभियंता श्री. देसाई यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. देवरूख-मार्लेश्वर रस्ता तत्काळ सुस्थितीत करावा; खड्डे भरून डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तत्काळ कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनातून दिला आहे. निवेदन देते वेळी ओबीसी सेल देवरूख शहर अध्यक्ष यशवंत गोपाळ, तालुका कार्यकारिणी सदस्य अमोल गायकर, दीपक खेडेकर, ओझरे गटाचे विभाग प्रमुख बाबू गुरव, महेंद्र पटेल आदी यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:43 PM 11-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here