लोकजागृती फाउंडेशन व रुग्ण कल्याण समितीतर्फे रक्तदान शिबिर

0

चिपळूण : कापरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लोकजागृती फाउंडेशन, रत्नागिरी व रुग्ण कल्याण समितीतर्फे २१ डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्या व कापरे रुग्णकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल काणेकर यांनी दिली. नागरिकांनी दवाखान्यात रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी परिसरातील सरपंच व पदाधिकारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ. मंदार चांदीवडे व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:44 PM 11-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here