रत्नागिरी नगरपरिषदे करिता अग्निशमन वाहन खरेदीस मंजुरी

0

🔳 ५० लाखांचा अत्याधुनिक फायर फायटर नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेच्या ताफ्यात येणार

रत्नागिरी : मुख्याधिकारी, रत्नागिरी यांनी रत्नागिरी नगरपरिषदे करिता अग्निशमन वाहन शासनाच्या दरपत्रकानुसार खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मंजूरीस्तव जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेमार्फत सादर केला होता. सदर प्रस्तावावर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांची तांत्रिक मंजूरी प्राप्त झाली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेकडे दोन अग्निशमन वाहने असून त्यापैकी अग्निशमन वाहन क्रमांक एम.एच.०८ जी ८८९१ हे वाहन २० वर्षापूर्वीचे असल्याने वारंवार नादुरूस्त होत आहे. परिणामी दुरूस्तीवर होणारा खर्च लक्षात घेता सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ९ दिनांक १४.६.२०१९ रोजी वाहन निर्लेखित करून नविन अग्निशमन वाहन घेणेस मंजूरी देण्यात आली आहे. रत्नागिरी नगरपरिषद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याने व्हीआयपी दौरे, कोस्टल स्टेशनसाठी येणारी विमाने, विविध आंदोलने व तसेच रत्नागिरी नगरपरिषदे पासून ९० कि.मी. चिपळूण व ७० कि.मी राजापूर पर्यन्त अग्निशमन सेवा उपलब्ध नाही यासाठी रत्नागिरी नगपरिषदेस अग्निशमन वाहनाची आवश्यकता आहे. उपलब्ध वाहन हे शहरातील अग्निसुरक्षेचे आव्हान पेलण्यास सक्षम नसून शहराव्यतिरिक्त नगरपरिषद हद्दीबाहेर मोठी आग अथवा दुर्घटना घडल्यास शहरासाठी दुसरे पर्यायी अग्निशमन वाहन उपलब्ध नसल्यामुळे मोठी जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रसंगाना योग्य व सुरक्षितरित्या हाताळण्या करिता अग्निशमन विभागास एक अद्यावत अग्निशमन वाहनांची नितांत गरज भासल्याने जे एम.पोर्टलवर वाहनाची खरेदी करणार आहे. मुख्याधिकारी, रत्नागिरी नगरपरिषद यांना अग्निशमन वाहन खरेदी करण्यास मंजूरी देण्यात येत असल्याचे आदेश विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन, कोकण विभाग अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:41 PM 11-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here