दापोलीत एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

दापोली : तालुक्यातील पालगड विभागातील एका खेड्यात तीन अल्पवयीन शाळकरी मुलांनी एका शाळकरी मुलीवर सातत्याने अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याबाबत तीन अल्पवयीन मुलांवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. १२ मार्च ते २१ जून २०१९ या कालावधीत घडला. घरात आई-वडील नसताना तीन शाळकरी अल्पवयीन मुले संबंधित शाळकरी मुलीवर अत्याचार करीत असल्याचे तपासात उघड झाले. याबाबत वैद्यकीय चाचणीनंतर संबंधित शाळकरी मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here