‘काँग्रेसच्या 2014 च्या पराभवाला सोनिया गांधी, मनमोहन सिंह जबाबदार’, प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून गौप्यस्फोट

0

नवी दिल्ली : सतत होत असलेल्या पराभवामुळं पिछाडीवर आलेल्या काँग्रेसमधील नेत्यांवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभ राहत असताना आता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातून काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन ऑगस्ट महिन्यात झालं. त्यांनी 2014 च्या काँग्रेसच्या पराभवाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे की, काँग्रेसचे काही सदस्य असं मानत होते की जर ते पंतप्रधान झाले तर पक्षाच्या हातून सत्ता गेली नसती. ‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ या आपल्या पुस्तकातून त्यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:49 PM 12-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here