‘साहेब, तुम्ही होता म्हणून…’; संजय राऊतांचं लक्षवेधी ट्वीट

0

मुंबई : महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार आज वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहेत. या निमित्तानं पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच पवारांचं अभिष्टचिंतन केलं आहे. शुभेच्छापर संदेश लिहिताना अनेकांनी पवारांच्या नेतृत्वाचं गुणगान केलं आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना मोजक्या शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साहेब, तुम्ही होता म्हणूनी…’ इतकंच राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 12-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here