ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्थेची फसवणूक; डोंबिवलीतील बिल्डर्सवर गुन्हा दाखल

0

देवरुख : ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा देवरुखची दिशाभूल व फसवणुक केल्याप्रकरणी मुंबई-डोंबिवली येथील राणे होम्स बिल्डर्सवर देवरुख पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंग राणे असे त्या बिल्डर्सचे नाव आहे. याबाबतची फिर्याद ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा देवरुखचे शाखाधिकारी जयेश विलास जोशी यांनी दिली आहे. या फिर्यादीमध्ये आरोपी जयसिंग गोपाळराव राणे, प्रोप्रा.राणे होम्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स यांच्या विरोधात १७ लाख ६५ हजार ३०२ रुपयांची ठकवणूक केल्याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंग राणे यांनी ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्था शाखा देवरुखमध्ये जात आपण राणे होम्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स असल्याचे सांगत विश्वास संपादन केला व पतसंस्थेकडे नविन वाहन तारण कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी १५ लाख रुपये कर्जा करिता संस्थेला आवश्यक असणारी कागदपत्रे खोटी व बनावट तयार करुन ती खरी आहेत असे भासवले आणि ती कागदपत्रे कर्ज मंजूरी करीता पतसंस्थेमध्ये जमा करुन कर्ज मंजूर करुन घेतले. त्या कर्जाच्या नियमाप्रमाणे आजपर्यंत १७ लाख ६५ हजार ३०२ रुपये व्याजासह परफेड न करता ठकवणूक केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. तसेच संस्थेकडून मंजूर झालेल्या कर्जामधून खरेदी केलेल्या वाहन तारण वाहनाची रजिस्ट्रेशन कागदपत्रे जमा केलेली नाहीत, याबरोबरच गाडीचे हप्ते संस्थेमध्ये गाडी घेतल्यापासून आजपर्यंत जमा केलेले नसल्याने फिर्यादीत म्हटले आहे. संशयित आरोपी याने संस्थेची दिशाभूल करुन पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंग राणे याच्यावर विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि१० जूलै २०१५ ते १९ ऑगस्ट या कालावधीत हा गुन्हा घडला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग करत आहेत

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:21 PM 12-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here