रत्नागिरी : छोट्या बालकासोबत लैगिक चाळे करुन स्वतः सोबतही बालकाकडून लैगिंक चाळे करुन घेणाऱ्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मारुती मंदिर परिसरात ही घटना घडली. पीडित बालकाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा पीडित मुलगा आपल्या शाळेतील मुलांना लैगिंक चाळे करण्याबाबत सांगत असल्याचे शाळेतील शिक्षकांनी तक्रार केली. यावेळी चाईल्ड हेल्पलाईनच्या सदस्यांना शाळेत बोलवून घेण्यात आले होते. यावेळी पीडित बालकाने याची कबुली दिली. मात्र त्यांच्या सोसायटीत रहाणारा भावेश वरु हा काका, खेळण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला त्यांच्या घरी, किंवा बिल्डिंगच्या टेरेसवर घेऊन जातो. तेथे गेल्यानंतर तो आपल्याशी लैगिंक चाळे करतो, तर आपल्यालाही त्याच्या सोबत लैगिक चाळे करण्यासाठी भाग पाडत असल्याचे त्या बालकाने सांगितले. गेले अनेक महिने हा प्रकार सुरु असून त्यातूनच आपल्याला ही सवय लागल्याचे त्या बालकाने नातेवाईकांना सांगितले. पीडित बालकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भावेश वरु यांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ३७७ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
