रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची धुप थांबविणे, किनारा अधिक सुरक्षित करण्याबरोबरच येथील सौंदर्यात भर घालण्याच्या हेतूने समुद्रात 200 ते 300 मिटरवर रिब्स बांधण्याची महत्वाकांक्षी योजना मेरिटाईम बोर्डाने हाती घेतले आहे. या बाबत गुरुवारी स्थानिक व्यावसायिकांशी गणपतीपुळे देवस्थान सभागृहात झालेल्या अनौपचारिक चर्चेत माहिती देण्यात आली. यावेळी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, समुद्रात दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर रिब्स बांधल्यास पाण्याचा वेग कमी करण्यास मदत मिळेल. समुद्राच्या वेगवान लाटांचा मारा कमी झाल्याने समुद्राची धूप कमी होण्यास मदत होईल.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:37 PM 12-Dec-20
