शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल : सुशीलकुमार शिंदे

0

मुंबई : पद नसले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार आजही देशाचे नेतृत्व करत आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. ५० वर्षांत पवार यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांना अनेकांनी त्रास दिला. मात्र त्यांनी सामाजिक समतोल बिघडू दिला नाही, असे शिंदे म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता म्हणजे पवार. पवारांनीच मला राजकारणात आणलं आणि मोठं केले, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांचं कौतुक केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:08 PM 12-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here