चिपळूणात 108 च्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला मारहाण

0

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे अपघातग्रस्त युवकाला घेण्यासाठी गेलेल्या 108 ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला शनिवार दि. 12 डिसेंबर 2020 रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान दोघांनी मारहाण केली. पंचनामा होण्यापूर्वी अपघातग्रस्ताला नेऊ नये असे सांगत दोघांनी गमरे यास जबर मारहाण केली. तरीही ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर गमरे याने संबंधित अपघातग्रस्ताला कामथे येथील रुग्णालयात दाखल केले. या मारहाण विरोधात चिपळूण, मंडणगड, दापोली, गुहागर आणि खेड येथील 108 ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर एकत्र आले असून त्यांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मारहाण करणारे मार्गताम्हाणे येथील सुधीर (गोट्या) चव्हाण, सतीश (बाबल्या) चव्हाण यांच्यावर कारवाई न झाल्यास 108 ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर बंद पुकारणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:11 AM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here