शिवसेना युवा नेते बापू शिंदे यांच्या प्रयत्नाने भडकंबा येथील लाभार्थ्यांना कामगार कल्याण मंडळाच्या योजनेतून लाखो रुपयांचा लाभ

0

रत्नागिरी : शिवसेनेचे युवा नेते प्रशांत उर्फ बापू शिंदे गावातील व विभागातील जनतेच्या अडचणीला नेहमीच धावून जातात.साखरपा विभागातील विकासकामांना देखील ते नेहमीच प्रयत्नशील असतात. कामगार कल्याण मंडळामार्फत भडकंबा व पेठवाडीतील पुरुष व महिला कामगारांना सुमारे 5 लाख रु. रोख स्वरूपात व अत्यावश्यक साहित्य यांचे वाटप करणेत आले. या योजनेअंतर्गत 125 पुरुष व 100 महिला कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला. साहित्यामध्ये हेल्मेट, बॅटरी, सेफ्टी शूज, रिफ्लेक्टिव्ह जाकीट, हँड ग्लोव्हज, पत्र्याची पेटी, जेवणाचा डबा, वॉटर बॅग, चटई इ.14 वस्तुंचे वाटप प्रत्येक कामगाराला देणेत आले. याअगोदर गावातील 220 लाभ्यार्थाना मोफत गॅस व शेगडीचे वाटप देखील बापू शिंदे व त्यांचे बंधू अतुल शिंदे यानी केले आहे. पाणी टंचाईच्या काळात देखील सलग तीन महिने स्वतःच्या बोअरवेलवरून पंपाद्वारे अहोरात्र पाणी वाटप शिंदे कुटुंबीयांकडून केले जाते. गावातील शेतकऱ्यांचे गाई व म्हैशीच्या दुधाला चांगला भाव मिळावा म्हणून दूध डेअरीची स्थापना करून गावातील शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम करण्यात देखील त्यांना यश मिळाले आहे. गावात सुमारे 200 ते 250 लिटर दुधाचे संकलन केले जाते. त्यामुळे बापू शिंदे व त्यांचे बंधू अतुल यांच्या कामाचे कौतुक साखरपा विभागात नेहमीच होत असते. नुकतेच कामगार कल्याण मंडळाकडून उपलब्ध झालेल्या साहित्याचे वाटप जि. प. सभापती सौ.रजनी चिंगळे, पं. स. सदस्य जयाशेठ माने, बापू शिंदे, शेखर आकटे, पेठवाडी पोलीस पाटील सौ.विशाखा शिर्के, अजित भोसले, महादेव भोसले, अतुल शिंदे, चंद्रकांत कनवजे, मिलिंद शिंदे, आबा कानिटकर, अशोक सुतार, बाळू जामसंडेकर, बबन दुधाणे, कामगार कल्याण मंडळाचे श्री. बने व त्यांचे सहकारी व गावातील जेष्ठ नागरिक यांचे उपस्थितीत करणेत आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:33 AM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here