साळवी स्टॉप येथे चप्पलच्या दुकानाला आग; चप्पल, बूट जळून खाक

0

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे नेक्सा शोरूम समोर रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या चप्पलच्या दुकानाला शनिवारी रात्री मध्यरात्री 12.30 ते 1 च्या सुमारास अचानक आग लागली. रनपच्या अग्निशमन यंत्रणेने आग विझवली असली तरी या आगीत दुकानातील माल मोठ्या प्रमाणावर जळाला. काही दिवसांपूर्वीच साळवी स्टॉप येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेत चप्पलचे दुकान टाकण्यात आले होते. बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांचे हे दुकान असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी रात्री या दुकानाला बाहेरून लावलेल्या कापडाने पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण दुकान पेटले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:55 AM 14-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here