निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

0

सिंधुदुर्गनगरी : 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी जाहीर झाली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांमध्ये तब्बल 3 हजार 103 एवढी मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात नेहमीप्रमाणे महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. अंतिम 6 लाख 69 हजार 623 एवढी मतदार संख्या निश्‍चित झाली आहे. यात 3 लाख 33 हजार 284 पुरुष आणि 3 लाख 36 हजार 339 महिलांचा समावेश आहे. निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता या विधानसभा निवडणुकीसाठी 21 हजार 870 एवढ्या मतदारांची वाढ झाली आहे.2019 मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक विभागाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. या मतदारयादीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 69 हजार 623 एवढे मतदार आहेत.  लोकसभा निवडणुकीपूर्वी  जाहीर झालेल्या अंतिम मतदारयादीतील मतदारसंख्येपेक्षा या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये तब्बल 3 हजार 103 एवढ्या अधिक मतदारांची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 लाख 66 हजार 720 एवढे मतदार होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here