सेन्सेक्स तब्बल १६२९ अंकांनी उसळी

0

नवी दिल्ली : देशी आणि स्थानिक उत्पादक कंपन्यांवरील कराचा बोजा कमी करण्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या घोषणेनंतर आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स वधारला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल १६२९ अंकांनी वर  गेला. तर निफ्टीनेही ४३२ अंकांनी वाढून उसळी घेतली. सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून आज आणखी एक बूस्टर डोस देण्यात आला. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केला. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आले. आर्थिक विकासदर गेल्या साडेसहा वर्षांतील निच्चांकी पातळीवर आला आहे. त्यासाठी अर्थव्यवस्था पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी अर्थमंत्रालयाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करांमध्ये कपात करण्यात आली आहे. यामुळे अशा कंपन्यांना आता २२ टक्के कर द्यावा लागेल. तर अधिभार आणि सेस मिळून २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here