नेत्रावतीच्या इंजिनमध्ये बिघाड; कोकण रेल्वेचा खोळंबा

0

खेड : कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून मेंगलोर च्या दिशेने जाणारी ‘नेत्रावती’ सुपर फास्ट एक्स्प्रेसचे इंजिन कोकण रेल्वे मार्गावरील नातूनगर बोगद्यानजीक सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अचानक बंद पडल्याने कोकण मार्गावरील तब्बल १ तास ५० मिनिटे वाहतुकीचा खोळंबा झाला. एल. एल. टी. स्थानका वरून सुटलेली गाडी क्रमांक ०६३४५ नेत्रावती एक्स्प्रेस हि निर्धारित वेळेत धावत होती. मात्र हि गाडी नातुनगर बोगद्या नजीक आली असता गाडीचे इंजिन मध्ये बिघाड झाल्याने चालकाने हि गाडी थांबवली. याबाबत ची माहिती रेल्वे प्रशासनाला दिल्या नंतर खेड स्थानकाकडून नवीन इंजिन नातुनगर येथे पाठवण्यात आले. ते इंजिन जोडल्यानंतर सांयकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास नेत्रावती एक्स्प्रेस मेंगलोरच्या दिशेने रवाना करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:35 AM 15-Dec-20