मनसे सोबत आली तर वाईट काय ? : निलेश राणे

0

चिपळूण : नुकत्याच राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकींच्या तोफा थंडावल्या आहेत. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सोमवारी चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी स्थानिक निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला लक्ष्य करत २०२४ साली कोकणातील सर्व आमदार खासदार हे भाजपचेच असतील अशी गर्जना केली. तसंच, ‘सर्व मित्रपक्षांसोबत स्थानिक निवडणुकांसाठी चर्चा करणार असून जर मनसे सोबत आली तर वाईट काय?’ असं सूचक विधान केलं आहे. दरम्यान, मनसेशी हातमिळवणी स्थानिक पातळीवर असेल असा उल्लेख देखील त्यांनी केला.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याच्या सूचनाही राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 15-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here