केंद्राकडून राज्यांना जीएसटी तूट भरण्यासाठी सातवा हप्ता जाहीर

0

नवी दिल्ली : राज्यांना जीएसटी महसुलात झालेली तूट भरुन काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने राज्यांना 6 हजार कोटी रुपयांचा सातवा साप्ताहिक हप्ता जाहीर केला आहे. यापैकी, 5,516.60 कोटी रुपये 23 राज्यांना तर 483.40 कोटी रुपये 3 विधीमंडळ असलेल्या-दिल्ली, जम्मू आणि काश्मीर तसेच पुद्दुचेरी-या तीन केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. उर्वरित पाच राज्ये, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालैंड आणि सिक्कीम यांच्याकडे जीएसटी महसूलात तूट नाही.

केंद्र सरकारने जीएसटी अंमलबजावणीमुळे राज्यांना होणाऱ्या 1.10 लाख कोटीएवढी अंदाजित तूट भरुन काढण्यासाठी ऑक्टोबर 2020 मध्ये, एक विशेष खिडकी कर्ज योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत केंद्राकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सात टप्प्यात कर्जे दिली गेली. 23 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 7 डिसेंबर आणि 14 डिसेंबर अशा साप्ताहिक अंतराने दिली गेली. या सातव्या हप्त्यात दिली गेलेली रक्कम 5.1348 टक्के व्याजदरावर देण्यात आली आहे. आतापर्यंत या विशेष खिडकी कर्जयोजनेअंतर्गत, राज्यांनी सरासरी 4.7712 टक्के व्याजदराने 42 हजार कोटी रुपये कर्ज घेतले आहे. या विशेष खिडकी कर्ज योजनेशिवाय, केंद्र सरकारने सर्व राज्यांना त्यांच्या राज्य सकल उत्पादनाच्या 0.50 टक्के इतके कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे. वस्तू आणि सेवा करमहसुलातली तूट भरून काढण्यासाठी राज्यांना या पहिल्या पर्यायाचाही वापर करता येईल.सर्वच राज्यांनी पहिला पर्याय निवडला आहे. या अंतर्गत, सर्व 28 राज्यांना एकूण 1,06,830 कोटी रुपयांचे (राज्य जीडीपीच्या 0.50 टक्के) कर्ज घेण्याची परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्राला जीडीपीच्या 0.50 टक्क्यानुसार 15,394 कोटी रुपये आणि विशेष खिडकी कर्ज योजनेनुसार 5472.11देण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:24 PM 15-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here