मुंबई : दक्षिण मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग आज (ता.२०) कोसळल्याची घटना घडली. लोकमान्य टिळक मार्गावर असणाऱ्या अहमद इमारतीचा हा भाग सकाळी ११ वाजता कोसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्मिशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने कोणतेही हानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, धोकादायकच्या इमारतीच्या यादीत अहमद इमारतीचे नाव होते. या इमारतीतील रहिवाशांना काही दिवसापूर्वी दुसर्या ठिकाणी हलवण्यात आले होते. इमारतीच्या खाली असणार्या काही दुकान गाळ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इमारत कोसळल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी अग्मिशमन दल दाखल झाले. यानंतर बचाव कार्य वेगाने सुरु करण्यात आले.
