सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ अखेर जानेवारी २०२१ पासून होणार कार्यान्वित

0

नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. जानेवारी २०२१ पासून चिपी विमानतळ कार्यान्वित होणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळासाठी परवाना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आयटी यंत्रणा, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, प्रशिक्षित अग्निशमन दल अशा काही बाबींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश विमानतळ विकासकांना देण्यात आले आहेत. तर जानेवारी २०२१ ची डेडलाईन गाठण्यासाठी सर्व भागदारकांशी समन्वय साधावा, अशी विनंती केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाकडून राज्य शासनाला करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
4:11 PM 15-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here