मिरजोळे येथे धाड टाकत ४६ हजारांचा दारूसाठा जप्त

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे मंगळवारी सकाळी ७.३० वा. सुमारास शहर पोलिसांनी धाड टाकून ४६ हजार १५० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी सदानंद सीताराम भरणकर (६०.रा. पाटीलवाडी-मिरजोळे,रत्नागिरी) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांच्या पथकाला मिरजोळे येथे गावठी दारुचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार पाटील, डी. सी. कांबळे, जाधव, पोलिस हेड कांस्टेबल पवार, बर्गे, पोलिस नाईक सावंत, शिंदे, धनावडे, आंब्रे यांच्या पथकाने हा छापा टाकला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:42 PM 16-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here