चांगझोऊ : नुकतीच वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्णपदक जिंकणारी भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू चीन ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 स्पर्धेतून बाहेर पडली. गुरुवारी दुसर्या फेरीतील झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानी असणा-या थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग हिने सिंधूचा 12-21, 21-13, 21-19 ने धक्कादायक पराभव केला. हा सामना 58 मिनिटे चालला. सिंधूने पहिला गेम सहज जिंकला. परंतु, उर्वरित दोन गेममध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला थायलंडच्या खेळाडूला टक्कर देता आली नाही. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात थायलंडच्या खेळाडूचा सामना चीनच्या चेन यू फेईशी होईल. चेनने दक्षिण कोरियाच्या एन से यंग हिचा 20-22, 21-17, 21-15 असा पराभव करून अंतिम 8 मध्ये स्थान मिळविले. 2016 मध्ये चीन ओपन स्पर्धा जिंकणार्या 24 वर्षीय सिंधूने चीनच्या माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ली ज्यूए रुई हिच्यावर 21-18, 21-12 मात करून दुसर्या फेरीत प्रवेश केला होता. चीन ओपन स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये भारताची विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूचा गुरुवारी धक्कादायक पराभव झाला. थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग हिने सिंधूवर 12-21, 21-13, 21-19 ने मात केली व घरचा रस्ता दाखवला. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने पहिला गेम 21-12 जिंकला, पण त्यानंतरचे दोन सामने गमावले. चोचूवोंगने 58 मिनिटांत सिंधूचा पराभव केला. सिंधूविरूद्धचा हा त्यांचा पहिला विजय आहे. तत्पूर्वी, ते तीनही सामन्यात पराभूत झाले.
