धारदार हत्याराने वार केलेल्या ‘त्या’ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील एका कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेवर धारदार हत्याराने वार केलेल्या घटनेतील महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मारुती राजाराम मोहिते-पाटील (रा. हातकणंगले, कोल्हापूर) या संशयिताविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवींद्र मेस्त्री-वझे (रा. सडेवाडी, जयगड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांची सून दीक्षा किरण मेस्त्री-वझे (३२, रा. जयगड) ही डेक्कन ओव्हरसीज प्रा. लि. कंपनीत जेवण बनविण्याचे काम करत होती. सोमवारी ती कंपनीमध्ये साफसफाईचे काम करत असताना संशयिताने तिच्या डोक्यावर वार करून पळ काढला. दरम्यान, तिच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी तिचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 17-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here